गुगल कंपनीच्या मोफत इमेल सेवेत शनिवारी अनेक अडथळे आले होते, सॉफ्टवेअरमधील दोषामुळे या अडचणी आल्या त्यामुळे आम्ही ऑनलाइन सेवेतील या त्रुटींबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असे गुगलने म्हटले आहे.
गुगलचे अभियांत्रिकी उपाध्यक्ष बेन ट्रेनर यांनी ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे, की अनेक गुगल वापरकर्त्यांना जेमेल, गुगल प्लस, कॅलेंडर, डॉक्युमेंट सेवा वापरताना शनिवार सकाळपासून अॅक्सेस मिळत नव्हता. किमान २५ मिनिटे गुगलच्या सेवेवर परिणाम झाला होता. किमान १० टक्के वापरकर्त्यांना ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ अडचणींना तोंड द्यावे लागले. गुगलने शनिवारी सेवेत अडथळे आल्याचे म्हटले असले, तरी शुक्रवारीही सेवेत बरेच अडथळे होते असे दिसून आले.
जी-मेल सेवेत नेमका काय बिघाड झाला होता याची जाहीर वाच्यता आम्ही करणार नाही पण त्याचा लोकांना काही फटका बसला व लाखो लोकांना गुगलच्या सेवांचा वापर करता आला नाही. युरोप, कॅनडा, अमेरिका व इतर ठिकाणाहून अनेक तक्रारी आल्या. ऑनलाइन गुगल अॅप ट्रॅकिंग डॅशबोर्डने म्हटले आहे, की जी-मेल व गुगल प्लस या सेवांमध्ये अडथळे आले. ही सेवा किती काळ ग्राहकांना मिळाली नाही हे नेमके सांगता येणार नाही पण आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. गुगलची सेवा अधिक जलद कशी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न नेहमीच सुरू आहेत. आता सर्व समस्या सुटल्या आहेत व अशा समस्या पुन्हा येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. गुगलच्या प्रतिस्पर्धी याहू कंपनीच्या इमेल सेवेत डिसेंबरमध्ये बिघाड झाला होता. आता त्यांनी गुगलमध्ये बिघाड झाल्याची संधी घेऊन जी-मेलवरील टीकेचा पाढा ट्विटरवर वाचला आहे. याहूने गुगलचा ‘अॅपॉलायाजिंग द प्राब्लेम’ हा संदेशच ट्विटरवर टाकून खुन्नस काढली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 4:19 am