16 January 2021

News Flash

कॅलिफोर्निया : हल्लेखोराने पत्नीसह 5 जणांना केलं ठार, स्वतःलाही संपवलं

त्या अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या पत्नीलाही गोळ्या घालून ठार केलं

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये बेकर्सफील्ड कंपनीजवळ एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांना ठार केल्यानंतर या हल्लेखोराने स्वतःवरही गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या पत्नीलाही गोळ्या घालून ठार केलं.


 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्थानीक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 5.20 वाजता एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत बिअर माउंटन स्पोर्ट्सजवळ आला. त्या ठिकाणी ट्रकचा व्यवसाय होतो. पत्नीला ठार करण्याआधी हल्लेखोराने तेथे उपस्थित एका व्यक्तीला गोळी मारली. ही घटना जवळील अन्य एका व्यक्तीने पाहिली, त्यानंतर हल्लेखोराने त्या व्यक्तीलाही ठार केलं. तीन जणांना ठार केल्यानंतर हल्लेखोर तेथून पळाला. घटनास्थळावरुन पळ काढताना त्याने अन्य दोन व्यक्तींवरही गोळीबार केला. मात्र, रस्त्यात त्याला पोलिसांनी घेरलं. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळीबार केला. अद्याप हल्लेखोराची ओळख पटलेली नसून इतर मृत त्याच्या ओळखीचे होते की नाही याबाबतही तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 11:01 am

Web Title: us gunman kills 5 people in california before shooting himself
Next Stories
1 २०० रुपये उधार घेऊन खरेदी केलेल्या तिकीटावर लागली दीड कोटींची लॉटरी
2 …म्हणून मी सीरियल किलर झालो, ३३ ट्रकचालकांची हत्या करणाऱ्या नराधमाचा खुलासा
3 जम्मू-काश्मीर : बारामुल्लामध्ये इंटरनेट बंद, दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच
Just Now!
X