25 February 2021

News Flash

अमेरिका: नग्नावस्थेत आलेल्या हल्लेखोराच्या गोळीबारात चौघे ठार, अनेकजण जखमी

गोळीबार सुरू असतानाच वाफ्फेल हाउसमधील एका ग्राहकाला हल्लेखोराच्या हातातील बंदूक हिसकावून घेण्यात यश आले. पण हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला.

अमेरिकेतील टेनेसीमधील नॅशविल्हे येथील एका रेस्तराँमध्ये एका नग्नावस्थेत आलेल्या एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. (Photo Source- NASHVILLE POLICE DEPARTMENT)

अमेरिकेतील टेनेसीमधील नॅशविल्हे येथील एका रेस्तराँमध्ये एका नग्नावस्थेत आलेल्या एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये चार जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहे. ‘रॉयटर्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार बंदुकधारी हल्लेखोराने एआर-१५ असॉल्ट रायफलने गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला अजून ताब्यात घेण्यात आलेले नाही. घटनेनंतर परिसरात दहशत असून लोकांना घरांचे दरवाजे बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार नॅशविल्हे मेट्रो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशविल्हे परिसरातील अँटिओक येथील वाफ्फेल हाउसमध्ये ३.२५ च्या सुमारास नग्नावस्थेत आलेल्या एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोराने हिरव्या रंगाचा जॅकेट घातला होता. गोळीबार केल्यानंतर त्याने जॅकेट काढले आणि नग्नावस्थेतच तो पळून गेला.

गोळीबार सुरू असतानाच वाफ्फेल हाउसमधील एका ग्राहकाला हल्लेखोराच्या हातातील बंदूक हिसकावून घेण्यात यश आले. ज्या व्यक्तीने हल्लेखोराच्या हातातील रायफल हिसकावून घेतली तो खरंच हिरो आहे, असे पोलीस प्रवक्ता डॉन एरोन यांनी म्हटले. संशयित हल्लेखोराचे नाव ट्रेव्हिस रिनकिंग असून तो इलिनॉयसमधील मॉर्टन येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्ल्यामागचे कारण समजू शकलेले नाही. संशयित दिसताच त्वरीत सूचना देण्यासाठी पोलिसांनी एक फोन क्रमांकही जारी केला आहे. नॅशविल्हे पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो आणि त्याची माहिती ट्विट केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 8:32 am

Web Title: us gunman kills four at nashville waffle house hero grabs gun at nashville waffle house
Next Stories
1 आसाममधील पीडित मुलीच्या धर्मावरूनही राजकारण
2 ५० आयआयटीयन्सचा दलित हक्कांसाठी स्वतंत्र पक्ष
3 काबूलमध्ये हल्ल्यात ५७ ठार
Just Now!
X