15 January 2021

News Flash

अमेरिकन संसद भवन हिंसाचारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

पाच स्वपक्षियांनी देखील दिलं महाभियोगाला समर्थन

(REUTERS/Leah Millis/File)

कॅपिटॉल बिल्डिंग (अमेरिकन संसद भवन) हिंसाचारप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. सदनाच्या २१५ पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि पाच रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिलं आहे. महाभियोग चालवण्यासाठी २१८ मतांची गरज होती. रॉयटर्सच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, कॅपिटॉल बिल्डिंगवर गेल्या आठवड्यात झालेला हिंसक हल्ला पाहता अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर डेमोक्रेटिक नेत्यांच्या नियंत्रणाखालील अमेरिकन प्रतिनिधी सभेने बुधवारी मतदान केलं.

महाभियोग प्रस्तावावर मतदानासह ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले असे राष्ट्रपती बनले आहेत ज्यांच्याविरोधात दोनदा महाभियोग चालणार आहे. खासदार जॅमी रस्किन, डेव्हिड सिसिलिने आणि टेड लियू यांनी महाभियोगाचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला प्रतिनिधी सभेच्या २११ सदस्यांनी अनुमोदन दिले होते.

या महाभियोग प्रस्तावात ट्रम्प यांच्यावर ६ जानेवारी रोजी राजद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटॉल बिल्डिंगला घेरण्यासाठी तेव्हा चिथावणी दिली जेव्हा तिथे इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी सुरु होती, असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 9:49 pm

Web Title: us house set to vote on the impeachment of us president donald trump over role in capitol assault aau 85
Next Stories
1 विशेष विवाह कायदा: ३० दिवसांच्या पूर्व नोटीशीची बाधा संपुष्टात; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
2 आत्मनिर्भर भारत: IAF साठी ८३ ‘तेजस’ फायटर विमानं विकत घेणार, ४८ हजार कोटीच्या व्यवहाराला मंजुरी
3 ‘केंद्राने नाही दिली, तर आम्ही दिल्लीच्या जनतेला मोफत करोना लस उपलब्ध करुन देऊ’
Just Now!
X