अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे.

करोना साथीनंतर अनेक अमेरिकी कंपन्यांनी भारत व त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तेथे गुंतवणूक केली आहे, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी म्हटले आहे.

या वर्षी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच गुगलने भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून फेसबुक  ट्विटर यांनीही गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. भारतात गुंतवणूक करण्याबाबत उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय मध्य पूर्व व अतिपूर्वेकडील देशातूनही भारतात गुंतवणूक होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.