News Flash

पॅसिफिक समुद्रात अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान कोसळले

विमानाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

पॅसिफिक समुद्रात अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. विमानात एकूण ११ जण होते. युद्धनौकेवर परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. विमानाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

बुधवारी जपानमधील स्थानिक वेळेनुसार अमेरिकेच्या नौदलाचे विमान रोनाल्ड रॅगन या युद्धनौकेवर परतत होते. या विमानात ११ जण होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी हे विमान कोसळले. विमान का कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी नौदलाच्या पथकाने बचावकार्य आणि शोधमोहीमेला सुरुवात केल्याचे अमेरिकेतील नौदलाने सांगितले. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तीन युद्धनौका सरावासाठी या भागात आल्या होत्या. जपान आणि दक्षिण कोरियाच्या नौदलांसोबत हा संयुक्त सराव करण्यात आला होता. उत्तर कोरिया आणि अमेरिकामधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जपान आणि दक्षिण कोरियाच्या मदतीने सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याची ही दुसरी वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:55 pm

Web Title: us navy says aircraft with 11 people aboard crashed in pacific ocean aircraft carrier ronald reagan rescue operations
Next Stories
1 ‘एका मूर्खाने प्रस्ताव दिला, दुसऱ्यानं स्वीकारला’; काँग्रेस-हार्दिकवर भाजपची टीका
2 काँग्रेसचा माफीनामा; मोदींबाबत केले होते अपमानास्पद ट्विट
3 पुतण्या-पुतणीची काकानेच केली हत्या, पित्याने दिलेली सुपारी
Just Now!
X