News Flash

धक्कादायक! चर्चमधील पाद्रींकडून एक हजार लहान मुलांचे लैंगिक शोषण

पेनसिल्व्हेनियातील न्यायालयात ग्रँड ज्यूरि रिपोर्ट सादर करण्यात आला असून चर्चमधील अत्याचारांचा सखोल तपास करुन हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामधील कॅथलिक चर्चमधील पाद्रींनी सुमारे एक हजार लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात पीडितांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जाते. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही या पाद्रींनी केला होता.

‘बीबीसी’च्या वृत्तानुसार पेनसिल्व्हेनियामधील न्यायालयात ग्रँड ज्युरी रिपोर्ट सादर करण्यात आला असून चर्चमधील अत्याचारांचा सखोल तपास करुन हा अहवाल सादर करण्यात आला आहे. कॅथलिक चर्चमधील ३०० हून अधिक पाद्रींनी गेल्या ७० वर्षांमध्ये एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे या अहवालात म्हटले आहे. अॅटर्नी जनरल यांनी एक हजार पीडितांची ओळख पटवण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, ग्रँड ज्युरींनी पीडितांचा आकडा हजारपेक्षा जास्त असेल, असे म्हटले आहे. कॅथलिक चर्चमधील अत्याचारांबाबतचा हा आजवरचा सर्वात मोठा अहवाल असून १८ महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर हा अहवाल तयार करण्यात आला. अॅटर्नी जनरल जॉश शैपिरो यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल १,४०० पानांचा आहे. पेन्सिल्व्हेनिया आणि व्हॅटिकन सिटीतील चर्चच्या वरिष्ठांनी लैंगिक शोषणाची प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला. यामुळे ही प्रकरण न्यायालयात खटला चालवण्याच्या दृष्टीने जुनी झाली आहेत.  अत्याचार करणाऱ्या १०० पाद्रींचा आता मृत्यू झाला आहे. काही पाद्री निवृत्त झाले आहेत तर काही पाद्री आता सक्तीच्या रजेवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार पाद्रींनी लहान मुले आणि मुलींचे शोषण केले. काही वेळेला पाद्रींनी लहान मुलांचे अश्लील छायाचित्र काढले. उपचारासाठी आलेल्या लहान मुलीवरही एका पाद्रीने अत्याचार केल्याचे, या अहवालात म्हटले आहे. या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. अहवालातील नावे सार्वजनिक करु नये, अशी मागणीही पाद्रींच्या वतीने न्यायालयात करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:14 pm

Web Title: us pennsylvania grand jury report priests sexually assaulted over 1000 children
Next Stories
1 उद्यापासून JioPhone 2 चा फ्लॅशसेल सुरू, कशी करायची नोंदणी?
2 अरविंद केजरीवाल विरोधकांना उद्देशून म्हटले, हम होंगे कामयाब?
3 केरळमध्ये पावसाचं थैमान! शनिवारपर्यंत कोची विमानतळ बंद, ४५ जणांचा मृत्यू
Just Now!
X