अमेरिकेत एका सीरियल किलरला अटक करण्यात आली आहे. चौकशी केली असता आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपीने आतापर्यंत ९० जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने कॅलिफोर्नियापासून ते फ्लोरिडापर्यंत या सर्व हत्या केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांची हत्या केली आहे त्या सर्वांचे चेहरे त्याने अजूनही लक्षात ठेवले आहेत. ७८ वर्षीय या आरोपीचं नाव सॅम्यूअल आहे. आरोपीच्या निशाण्यावर सामाजिक, आर्थिकदृष्टीने गरिब महिला होत्या. यामध्ये खासकरुन व्यसन असणाऱ्या तसंच तसंच देहविक्रीय करणाऱ्या महिलांचा समावेश होता.

आरोपीने सर्वात जास्त हत्या १९७० ते १९८० च्या काळात केल्या आहेत. आरोपी हत्या केल्यानंतर मागे एकही पुरावा सोडत नसे. सॅम्यूअल हत्या करताना पहिल्यांदा महिलेला बेशुद्ध करत असे. नंतर हस्तमैथुन करत गळा दाबून हत्या करत असे. पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या कारागृहात आहे.

पोलीस त्याच्याकडून अजून काही माहिती मिळतीये का यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी गेल्या चार दशकांपासून वेगवेगळ्या देशात प्रवेश करत असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं आहे. आपल्याला दुसऱ्या कारागृहात हलवलं जावं अशी मागणी करत सॅम्यूअलने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

एफबीआयने त्याने कारागृहातून दुसरीकडे हलवण्याची मागणी का केली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट नसल्याचं सांगितलं आहे. एका महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करत कॅलिफोर्निया कारागृहात आणण्यात आलं होतं. पुढील शिक्षा टेक्सास कारगृहात घालवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.