News Flash

लख्वीविरोधात अमेरिकेकडून सबळ पुरावे पाकिस्तानला सादर

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार असलेला लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याच्या विरोधात विश्वासार्ह पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत

| March 18, 2015 12:51 pm

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार असलेला लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याच्या विरोधात विश्वासार्ह पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने येथे सांगितले. २६ नोव्हेंबरला झालेल्या या हल्ल्याबाबत पाकिस्तानने गुन्हेगारांना शिक्षा केलीच पाहिजे, असा सज्जड दम दिला होता. त्यानंतर आता अमेरिकेकडून प्रत्यक्ष त्याच्या पाठपुराव्यासाठी कृतीही करण्यात आली आहे.
अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले, की लख्वीच्या विरोधात अमेरिकेने सज्जड पुरावे दिले आहेत. पण नेमके काय पुरावे दिले आहेत हे आपण सांगू शकत नाही कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
अमेरिकेने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वी व इतरांवर कारवाईसाठी दिलेले पुरावे सबळ आहेत ते डेव्हिड हॅडलीच्या जबाबाच्या आधारे देण्यात आले आहे. सध्या लख्वी पाकिस्तानात तुरुंगात असून त्याला अलीकडेच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोडून देण्याचा आदेश दिला होता, पण भारताने निषेध व्यक्त करताच पुन्हा एक महिन्यासाठी त्याला तुरुंगात टाकण्यात आले. मुंबई हल्ल्याबाबत अमेरिकेतील सुरक्षा व गुप्तचर संस्थांनी वेगळा तपास केला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधात ठोस सहकार्य करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले, की पाकिस्तान सरकारनेही मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
लख्वी याच्याशिवाय अब्दुल वाजिद, मजहर इक्बाल, हमद अमिन सादिक, शाहिद जमील रियाझ, जमील अहमद, युनूस अंजुम यांच्यावरही मुंबई हल्लाप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:51 pm

Web Title: us presented strong the evidence to pakistan against lakhvi
टॅग : Zaki Ur Rehman Lakhvi
Next Stories
1 बुगती हत्या खटला : मुशर्रफ यांना अनुपस्थित राहण्याची सवलत नाही
2 स्मार्ट सिटी प्रकल्प पुढील महिन्यात सुरू होणार
3 सुकन्या समृद्धी योजनेत कर्नाटकची आघाडी
Just Now!
X