27 November 2020

News Flash

करोनामधून बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा, म्हणाले…

"करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम आणि भयंकर"

संग्रहित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले असून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला असून करोनाचा फैलाव केल्याबद्दल टीका केली. तसंच चीनने आपल्यासोबत जे केलं आहे ते कधीच विसरणार नाही असा पुनरुच्चार केला.

“चीनसोबत जे सुरु आहे याचा कोणी कधी विचारही केला नव्हता. जोपर्यंत करोना आला नव्हता तोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करत होतो. आपण करोनामधून बाहेर येत असून जवळपास २० लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती होती. पण आपण योग्य निर्णय घेतल्याने ही संख्या दोन लाख आहे. आपण कोणाचाही मृत्यू होऊ द्यायला नको होतं. त्यांनी आपल्यासोबत जे केलं आहे ते विसरणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी करोनाचा प्रसार होण्याआधी अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती असं म्हटलं. यावेळी त्यांनी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम असल्याचा दावा केला. “आपण सर्व एकत्रित येत होते आणि यासाठी यश हा महत्वाचा मार्ग होता. जोपर्यंत ही कृत्रिम आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली नाही तोवर ते होतही होतं,” असं यावेळी ते म्हणाले.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून रुग्णसंख्येने ८० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या अमेरिकेत एकूण ८० लाख ८ हजार ४०२ करोना रुग्ण असून २ लाख १८ हजार ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 8:45 am

Web Title: us president donald trump again target china calls covid 19 as artificial horrible situation sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “कोणीही शूट करणार नाही,” जम्मू काश्मीरात नाट्यमय घडामोडींनंतर दहशतवाद्याचं आत्मसमर्पण, व्हिडीओ व्हायरल
2 रेमडेसिवीरसह चारही औषधे करोनावर गुणकारी नाहीत
3 उत्तराखंडमधील पाणथळ रामसर यादीत
Just Now!
X