09 August 2020

News Flash

ट्रम्प यांची वागणूक दबावाची-माजी राजदूत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग तक्रारीबाबत सध्या जी जाहीर सुनावणी सुरू आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग तक्रारीबाबत सध्या जी जाहीर सुनावणी सुरू आहे, त्यात युक्रेनमधील अमेरिकेच्या माजी राजदूत मारी यावानोविच यांची साक्ष शुक्रवारी झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नेहमीच आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, असे वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांचे पुत्र हंटर बिदेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप आहे. त्यात वकील रूडी गिलीयानी यांनी ट्रम्प यांना मदत केली होती. बिदेन हे आगामी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीचे दावेदार आहेत.

श्रीमती योवानोविच या राजनैतिक अधिकारी होत्या. त्यांना ट्रम्प यांनी मे महिन्यात पदावरून दूर केले होते. युक्रेनच्या अध्यक्षांवर चौकशीसाठी दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या कारस्थानात सहभागी होण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 2:45 am

Web Title: us president donald trump akp 94
Next Stories
1 भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन
2 बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक
3 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक?
Just Now!
X