News Flash

Video: साबरमती आश्रमात ट्रम्प दाम्पत्यानी केली सूत कताई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले असून त्यांचा नियोजित दौराही सुरु झाला आहे.

साबरमती : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात सूत कताई केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले असून त्यांचा नियोजित दौराही सुरु झाला आहे. सुरुवातीला रोड शो केल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प या दाम्पत्याने चरख्यावर सूत कताई देखील केली. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.

ट्रम्प दाम्पत्याचे साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना खादीची शाल भेट देण्यात आली. दरम्यान, मोदींनी त्यांना या आश्रमाची माहिती दिली. यावेळी ट्रम्प दाम्पत्याने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर या आश्रमाचे महत्व मोदींनी त्यांना समजावून सांगितले.

दरम्यान, सुरुवातीला मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना चरख्यावर सूत कताई कशी करायची याची माहिती दिली. त्यानंतर आश्रमातील महिला सेवकांनी त्यांना चरख्यावर सूत काळजीपूर्वक कसं कातलं जात याचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर त्यांनी कताईची पद्धत समजावून घेत चरखाही चालवला.

यानंतर ट्रम्प यांनी आश्रमातील नोंदवहीत आपला संदेश लिहिला. यामध्ये त्यांनी लिहिले, “माझे महान मित्र मोदी, या अविस्मरणीय प्रवासासाठी धन्यवाद!”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:55 pm

Web Title: us president donald trump and first lady melania trump spin the charkha at sabarmati ashram aau 85
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या विमानामधला फरक समजून घ्या…
2 “…तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीबरोबर रांगेत उभं राहून शिवथाळीचा आस्वाद घेतला असता”
3 धक्कादायक… १२ तास हायवेवर पडून होता मृतदेह; शेकडो गाड्यांनी चिरडला
Just Now!
X