अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमारेषा वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत सुरु असलेल्या वादावरुन नरेंद्र मोदी सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत अशी माहिती व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली होती. पीटीआयनेही यासंबंधी वृत्त दिलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. ४ एप्रिल रोजी हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्यात शेवटची चर्चा झाली होती,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयानेही चीनसोबत प्रस्थापित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे”.
Clarification by govt sources that there was no recent Modi-Trump contact comes after US prez said he spoke to Modi over Ladakh standoff.
— Press Trust of India (@PTI_News) May 29, 2020
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले आहेत ?
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारत-चीन सीमा वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली चर्चा झाल्याचं सांगितलं. यावेळी नरेंद्र मोदीसोबत चीनसोबत सुरु असलेल्या वादामुळे चांगल्या मूडमध्ये नसल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
#WATCH “We have a big conflict going on between India & China, 2 countries with 1.4 billion people & very powerful militaries. India is not happy & probably China is not happy, I did speak to PM Modi, he is not in a good mood about what’s going on with China”: US President Trump pic.twitter.com/1Juu3J2IQK
— ANI (@ANI) May 28, 2020
“भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची १.४ अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही शक्तिशाली आहे. भारत या संपूर्ण प्रकारावरुन नाराज आहे, तसंच चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड अजिबात ठीक नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य कऱण्याच्या एक दिवस आधी भारत आणि चीनदरम्यान मध्यस्थी करण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं होतं. ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला आपण मध्यस्थीसाठी तयार असल्याचं कळवलं आहे असं ते म्हणाले होते. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी आम्ही चीनसोबत शांततेत मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 29, 2020 10:13 am