News Flash

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी, पत्नीसोबत क्वारंटाइन

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करुन दिली माहिती

संग्रहित (Reuters)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी करण्यात आली आहे. नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान सध्या डोनाल्ड ट्रम्प पत्नीसोबत क्वारंटाइन झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे”.

होप हिक्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार म्हणून काम करतात. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या चर्चेसाठी त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होत्या. व्हाइट हाऊसमध्ये करोनाची लागण झालेल्या त्या आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. व्हाइट हाऊसकडून यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं असून राष्ट्राध्यक्ष आपली तसंच आपल्या समर्थन असणाऱ्यांची आणि अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्यानं दखल घेत असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 9:40 am

Web Title: us president donald trump melania undergo covid 19 test sgy 87
Next Stories
1 “मीडिया काही दिवसांनी निघून जाईल, आम्ही इथेच आहोत,” हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी
2 ‘हाथरसमध्ये नक्की काय घडलं ते सांगा’; वरिष्ठ अधिकाऱ्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाची नोटीस
3 “कोणालाही घाबरणार नाही; कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही”
Just Now!
X