02 March 2021

News Flash

ट्रम्प यांच्या तोंडी भारताची भाषा; पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची टीका

अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये अपयश आल्यामुळे ते आता पाकिस्तानला बळीचा बकरा बनवू पाहत आहेत.

| January 5, 2018 09:17 am

Pakistan Foreign Minister Khawaja Asif : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची गेल्या काही काळातील एकूणच विधाने पाहता ते भारताची भाषा बोलू लागल्याचे दिसतेय, अशी उपरोधिक टीका आसिफ यांनी केली.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड सध्या भारताची भाषा बोलू लागले आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी गुरूवारी संसदेत अमेरिका व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. यावेळी आसिफ यांनी म्हटले की, अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये अपयश आल्यामुळे ते आता पाकिस्तानला बळीचा बकरा बनवू पाहत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची गेल्या काही काळातील एकूणच विधाने पाहता ते भारताची भाषा बोलू लागल्याचे दिसतेय, अशी उपरोधिक टीका आसिफ यांनी केली.

यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकेला प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, आम्ही दहशतवाद रोखण्यासाठी काय केलं असं तुम्ही विचारलंत याचं उत्तर आमच्या देशातल्या तळांवरून तुम्ही अफगाणिस्तानवर ५७,८०० हल्ले चढवलेत आणि आमचे हजारो नागरिक व जवान तुम्ही सुरू केलेल्या युद्धात मारले गेले. पाकिस्तानच्या विरोधात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घणाघाती हल्ले केले असून पाकिस्तानचा काहीही फायदा नसल्याचे उलट त्रासच असल्याचे त्यांनी म्हटले होते. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय दहशतवाद संपवण्यासाठी हवं तसं सहकार्य केलं नसल्याचा आरोप करत अमेरिकेने पाकची आर्थिक रसद बंद करण्याचे सुतोवाचही केले होते.

अमेरिकेचा पाकला आणखी एक धक्का; आर्थिक मदतीपाठोपाठ सुरक्षा साहाय्यही नाकारले

याशिवाय, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी पाकिस्तानला पुरवण्यात येणारे सुरक्षा सहाय्यही थांबविण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल, असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.

अमेरिकेच्या कोणत्याही दंडात्मक कारवाईला प्रत्युत्तर देण्यास सज्ज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 9:17 am

Web Title: us president donald trump speaking india language pakistan foreign minister
Next Stories
1 अमेरिकेचा पाकला आणखी एक धक्का; आर्थिक मदतीपाठोपाठ सुरक्षा सहाय्यही नाकारले
2 डिझायनर बुरखा घालणे इस्लामविरोधी
3 निर्वाह भत्त्यावरून काँग्रेसने तलाक विधेयक रोखले
Just Now!
X