अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या रिपोर्टनुसार ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत आहे. ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरींना भेटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची टेस्ट करावी अशी चर्चा होत होती. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली मात्र ती निगेटीव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांची करोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

आपल्या शरीराचे तापमान नॉर्मल आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेत करोनाची लागण झाल्याने ४० जणांचा मृत्यू झाला आहे तर १३०० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आणीबाणीही जाहीर करण्यात आली आहे. ३० दिवसांपर्यंत युरोपातले सगळे प्रवास रद्द करण्यात आले आहेत असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.