News Flash

पंतप्रधान मोदींच्या आधी डोनाल्ड ट्रम्प घेणार इम्रान खान यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींना भेटण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

ह्युस्टनमध्ये होणाऱ्या “हाऊडी मोदी” कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजेच सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहेत. त्यानंतर मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ७४ व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांसोबत चर्चा करणार आहेत.

ह्युस्टन येथे होणारा “हाऊडी मोदी” कार्यक्रम आटोपल्यानंतर ट्रम्प रविवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये येण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि मोदी या कार्यक्रमात ५० हजार भारतीय-अमेरिकन नागरीकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमातून भारत-अमेरिका संबंध बळकट असल्याचा संदेश जाईल तसेच ट्रम्प त्यांच्या आगामी भारत दौऱ्याची सुद्धा घोषणा करु शकतात.

मंगळवारी ट्रम्प यांचे संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण होईल. त्यानंतर अन्य देशांच्या नेत्यांबरोबर त्यांचा द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रम ठरला आहे. मोदी-ट्रम्प यांच्या बैठकीत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. ट्रम्प यांची भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा होईल त्यावेळी सहाजिक काश्मीर मुद्दा असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यावर अधिक जोर देतील. पंतप्रधान मोदी यांनी याआधी ट्रम्प यांच्यासमोरच काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले होते.

हाऊडी, मोदी!” कार्यक्रमाबद्दल जयशंकर म्हणाले…
“हाऊडी, मोदी!” कार्यक्रमाला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती ही सन्मानाची बाब आहे असे जयशंकर म्हणाले. पाकिस्तानला यातून काय संदेश मिळणार या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, फक्त पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जग हाऊसटॉनचा हा कार्यक्रम पाहिल व भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांनी काय साध्य केले आहे हे सर्वांना समजेल. या कार्यक्रमात अनेक संदेश दडलेले आहेत. यातून काय घ्यायचे ते पाकिस्तान ठरवेल असे जयशंकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 11:37 am

Web Title: us president donald trump to meet pakistan pm first then pm modi dmp 82
Next Stories
1 चांद्रयान-२ : चंद्रावर रात्र, ‘विक्रम’शी संपर्काच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या!
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 आदरातिथ्य क्षेत्राला ‘जीएसटी’त सूट
Just Now!
X