News Flash

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी भारतीयांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

जो बिडेन म्हणाले...

संग्रहित छायाचित्र

अमेरिका, भारत आणि जगभरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जो बिडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड केली आहे.

अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जो बिडेन यांची लढत असणार आहे.

“अमेरिका, भारत आणि जगभरात हिंदू उत्सव गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या प्रत्येकाल सर्व अडथळयांवर मात करता येऊ दे, नव्या सुरुवातीकडे जाणारा मार्ग मिळूं दे, अशा शब्दात बिडेन यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदही भूषवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 9:52 pm

Web Title: us president nominee joe biden wishes indians on ganesh chaturthi dmp 82
Next Stories
1 दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याचं अखेर पाकिस्तानने केलं मान्य
2 बाबरी मशीद प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने CBI कोर्टाला मुदत दिली वाढवून
3 तबलिगी जमातला बळीचा बकरा बनवलं – मुंबई उच्च न्यायालय
Just Now!
X