अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही तरी २० जानेवारीला प्रेसिडेंट ऑफ दी युनायटेड स्टेटस (पोटुस) हे ट्विटर हँडल नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नावे केले जाईल, असे ट्विटरच्या सूत्रांनी म्हटले आहे.

हे खाते  अमेरिकी अध्यक्षांच्या नावे असते. ‘अ‍ॅट रिअल डोनाल्ड ट्रम्प’ हे खाते खासगी आहे. ते ट्रम्प नंतरही वापरू शकतील. बायडेन (वय ७८) हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जानेवारीत शपथ घेणार आहेत. सध्याच्या अध्यक्षीय  ट्विटर खात्यावरील संदेश जपून ठेवले जाणार आहेत. मावळते अध्यक्ष ट्रम्प यांच्या चमूने ट्विट करणे थांबवल्यानंतर हे खाते बायडेन चमूच्या ताब्यात दिले जाईल.