अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया सूरू झाली असून दुपापर्यंत ४ कोटी ६२ लाख मतदारांनी मतदान केले आहे.  सुरूवातीच्या टप्प्यात  डिक्सविले नॉचमध्ये हिलरी यांनी विजय मिळविला होता. यानंतर आता डिक्सविले नॉच, हॉर्ट्स लोकेशन आणि मिल्सफील्डस आदी ठिकाणचे मतदान झाले. येथे  ट्रंप आघाडीवर होते.

सहा ‘टाइम झोन्स’मध्ये पसरलेल्या अमेरिकेतील ५० राज्ये आणि वॉशिंग्टन डीसी हा राजधानीचा विशेष मतदारसंघ अशा विस्तृत भूभागात अमेरिकेचा ४५ वा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी एकूण १२ कोटी नागरिक मतदान करणार आहेत. या मतदानाचे विशेष  म्हणजे एका मतदाराने थेट अंतराळातून मतदान केले आहे. शेन किमब्रूव्ह असे या अंतराळवीराचे नाव असून तो नासासाठी कार्यरत आहे. अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने ही माहिती दिली आहे.

सध्याच्या मतदानाचा अंदाज घेता ही चुरशीची लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रेट या दोन पक्षात ही लढत सुरू आहे.  जर या निवडणुकीत हिलरी या विजयी झाल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील. हा अमेरिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. ‘हिलरी अमेरिकेचे भविष्य आहे’, असे म्हणत सध्याच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी यांना मतदान करण्याचे नागरिकांना अवाहन केले आहे.

डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी आणि रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात शेवटच्या मिनिटापर्यंत अत्यंत हिडीस भाषेचा नमुना दाखवत मतदारांना महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी निवडून देण्याचे आवाहन केले होते.  क्लिंटन यांनी पती बिल यांच्यासह न्यूर्यार्क येथील शाळेत मतदान केले. यावेळी मतदार आणि समर्थकांनी त्यांना ‘मॅडम प्रेसिडेण्ट’च्या घोषणांनी गराडा घातला. नॉर्थ कॅरोलिना येथे त्यांनी सोमवारी रात्री गायिका लेडी गागा हिचा कार्यक्रम असलेल्या सभेला भेट दिली.