26 February 2021

News Flash

‘जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग’

पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ.

(संग्रहित छायाचित्र)

 

चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.

करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. बायडेन यांनी गुरुवारी  सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे,  चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.

सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ. जगातील इतर देश व अमेरिका मिळून काही सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे, ज्या चीनला समजतील असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:02 am

Web Title: us rejoins who abn 97
Next Stories
1 युरोपात दोन लशींना डिसेंबरमध्ये मान्यता
2 WHO ने करोनावर देण्यात येणारं रेमेडिसविर औषध यादीतून केलं बाद
3 IAS अधिकारी टिना डाबी आणि अथर खान विभक्त होणार, घटस्फोटासाठी अर्ज दाखल
Just Now!
X