ग्रीसमध्ये एका अमेरिकन महिला वैज्ञानिकावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी २७ वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रीसच्या क्रिटी बेटावर ही घटना घडली. आरोपीने पाठलाग करुन महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिला बेशु्द्ध होऊन खाली पडली.

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेला उचलून गाडीत ठेवले व निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने बलात्कार करुन हत्या केली व मृतदेह दुसऱ्या महायुद्धातील एका बंकरमध्ये फेकून दिला. मृत महिलेला शेवटचे २ जुलैला पाहण्यात आले होते. पीडित महिला एका परिषदेसाठी ग्रीसमध्ये गेली होती. हत्या झाली त्यादिवशी त्या हायकिंगसाठी गेल्या होत्या.

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून समोर आले आहे. मृतदेह बंकरमध्ये टाकल्यानंतर तिथून निघताना आरोपीने बंकरचे प्रवेशद्वार लाकडांनी बंद केले. मृत महिला वैज्ञानिक दररोज पळायला जायच्या. त्यावेळी आरोपीने त्यांना पाहिले होते.