News Flash

महिलांना Sex Slaves बनवणाऱ्याला १२० वर्षांचा तुरुंगवास

अनेक महिलांनी केले होते लैंगिक शोषणाचे आरोप

कीथ रेनियर (फोटो सौजन्य : युट्यूबवरुन साभार)

स्वत:ला सेल्फ हेल्प गुरु म्हणवणाऱ्या अमेरिकेतील एका व्यक्तीला न्यायालयाने १२० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महिलांना सेक्स स्लेव्ह बनवण्याच्या खटल्यासंदर्भात कीथ रेनियरला दोषी ठरवण्यात आलं आहे. कीथवर महिलांची फसवणूक करुन करुन त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणजेच शरिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते. अनेक नामवंत श्रीमंत व्यक्ती कीथचे अनुयायी होते. कीथने त्याच्या अनुयायांना एनएक्ससीव्हीएम (Nxivm) असं नाव दिलं होतं.

असोसिएट फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी न्यू यॉर्कमधील एका न्यायालयाने कीथवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणांमध्ये त्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 60 वर्षीय कीथला १२० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्हणजेच आता कीथ तुरुंगाबाहेर येऊ शकत नाही. समोर आलेल्या माहितीनुसार कीथ आपल्या अनुयायांकडून पाच दिवसांच्या सेशन्ससाठी पाच हजार डॉलर्सची रक्कम घ्यायचा. अनेक महिलांनी कीथने केवळ आपली आर्थिक फसवणूक केली नसून लैंगिक अत्याचारही केले असल्याचे आरोप केले आहेत. कीथची संस्था पिरॅमिड पद्धतीने काम करायची. यामध्ये कीथ महिला अनुयायांना सेक्स स्लेव्ह आणि स्वत:ला ग्रॅण्ड मास्टर म्हणायचा. या महिलांनी कीथबरोबर शरीरसंबंध ठेवणे बंधनकारक असायचे.

अनेक महिलांनी साधनेच्या वेळी कीथ त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढून नंतर त्याचा वापर करुन ब्लॅकमेल करायचा असा आरोप केला आहे. अनेकांनी कीथच्या आश्रमामध्ये प्राण्यांबरोबर हिंसक व्यवहार होत असल्याचेही म्हटले आहे. कीथच्याविरोधात फसवणूक, सेक्स ट्रॅफिकिंग, खंडणी मागणे, गुन्हेगारी कारवाई करणे आणि एका १५ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. कीथने आपली फसवणूक करुन शरीर संबंध ठेवण्याची कबुली या मुलीने न्यायलयासमोर दिली.

कीथ विरोधात एकूण १५ लोकांनी न्यायालयासमोर साक्ष दिली. यामधील १३ साक्षीदार महिला होत्या. कीथच्या आश्रमाशी संबंधित नेक्सियम कल्टवर आधारित एक मालिका काही दिवसांपूर्वी एचबीएवरील एका मालिकेमधून समोर आली. यामध्ये अनेकांनी आपली फसवणूक झाल्याचे म्हटले होते.

न्यायालयाने निकाल देण्याआधी कीथने सर्व पीडितांची माफी मागितली आणि त्यांना आपल्याबद्दल असणारा राग आणि संताप आपण समजू शकतो असंही म्हटलं. कीथने स्वत:चा गुन्हा कबुल करण्याबरोबर या प्रकरणात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी न्यायधिशांकडे केली. कीथबरोबरच त्याच्या पाच साथीदारांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:30 pm

Web Title: us self styled guru keith raniere guilty of leading sex cult jailed for 120 years scsg 91
Next Stories
1 “फेक न्यूज पुरे झाल्या”; डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचाराची साईट हॅक
2 जम्मू-काश्मीर : बडगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी
3 अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ, पण…
Just Now!
X