अमेरिकेच्या सिनेटने चीनसोबत आर्थिक स्पर्धेत राहण्यासाठी आणि तेथील कम्युनिस्ट सरकारला करत असलेल्या कारवायांनी उत्तर देण्याच्या उद्देशाने बायडेन प्रशासनाने महत्त्वपूर्ण अशा विधेयकाला मंजूरी दिली आहे. सिनेटने हे महत्त्वपूर्ण विधेयक ६८ विरुद्ध 3२ अशा मताने मंजूर केले. या विधेयकामुळे सिनेटमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचे नेते चक शुमर यांचा हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. सिनेटने २४६ बिलियन डॉलर (जवळपास १७९४ कोटी ४४ लाख ४५ हजार ४००)च्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

तंत्रज्ञान संशोधन आणि उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी विधेयक

अमेरिकन सिनेटने तंत्रज्ञान संशोधन आणि उत्पादनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे विधेयक मंजूर केले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पारित केलेल्या काही मोठ्या ठरावांपैकी एक म्हणून या विधेकाकडे पाहिले जात आहे. बर्‍याच विषयांवर भूमिका पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध असणारे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन खासदार हे विधेयकाला मंजूरी देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहेत. हा नवीन प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: चीनबरोबर स्पर्धा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तरीही हे विधेयक अद्याप सभागृहात मंजूर होणे आवश्यक आहे. तरच त्याला कायद्याचे रूप देता येणार आहे.

या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या सभासदांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या इतिहासात हे आतापर्यंतची सर्वात मोठे विधेयक आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर अमेरिका केवळ संशोधनातच नव्हे तर उत्पादनाच्या बाबतीतही बरेच पुढे जाईल. याद्वारे भविष्यात जगातील औद्योगिक क्षेत्रात होणारी स्पर्धा लक्षणीय वाढेल असे नेते चक शूमर यांनी म्हटले आहे.

चिनी उत्पादनांना पर्याय उपलब्ध

या विधेयकाद्वारे तंत्रज्ञान संशोधन, सेमीकंडक्टर डेव्हलपमेंन्ट आणि त्याचे उत्पादन, रोबोट निर्माते, चिप उत्पादक आणि इतरांवर २५० अब्ज डॉलर्स खर्च केले जातील. कॉम्पुटर चिप्स नसल्यामुळे ऑटोमोबाईल उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. हे विधेयक चीनमधील उत्पादन लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. चिनी बनावटीच्या ड्रोन खरेदीवरही अमेरिका बंदी घालणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने चीनवर अमेरिकेत करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यांमध्ये हात असल्याचा आरोप केला होता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर चीनवर बंदी घालण्यासही मदत होईल.