गेल्या १९ वर्षांपासून युद्धात होरपळत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार करण्यात आला. या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार शांतता कराराचे पालन केल्यास येत्या १४ महिन्यात अमेरिका अफगाणिस्तानातून सगळ्या सैनिकांना माघारी बोलवेल अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.

अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे ऐतिहासिक शांतता करार झाला. तालिबानने शांतता करार पाळला तर अमेरिका ८ हजार ६०० सैनिक परत बोलवेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या जनतेला नवं भविष्य निवडा असं आवाहन केलं आहे. या शांती करारामुळे १८ वर्षांपासूनचा संघर्ष संपुष्टात आल्याची आशा आहे असं म्हटलं आहे. अमेरिकेत २०२० मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जातो आहे.