अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनच्या वस्तूंवर एकूण २०० अब्ज डॉलरहून अधिक कर लावणे हे जागतिक व्यापार संस्थेच्या नियमांनुसार बेकायदेशीर असल्याचे मंगळवारी जागतिक व्यापार संघटनेने (डब्ल्यूटीओ) म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासनाने अनेक देश, सहयोगी देश आणि प्रतिस्पर्धी देशांवर विविध कर लादले असून त्याविरुद्ध प्रथमच जिनेव्हास्थित व्यापार संघटनेने मत व्यक्त केले आहे. अमेरिकेवर अन्याय केल्याबद्दल ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेवर सातत्याने टीका केली आहे. अमेरिकेच्या हिताला बाधा आणणारे कृत्य चीन सातत्याने करीत असते हा ट्रम्प यांचा युक्तिवाद जागतिक व्यापार संघटनेने अमान्य केला आहे.