News Flash

सेल्फी काढताना गमावले प्राण

हल्ली सेल्फीचं आकर्षण फार वाढले आहे. एका तरुणाने सेल्फीच्या नादात आपले प्राण गमावले.

हल्ली सेल्फीचं आकर्षण फार वाढले आहे. स्वतःचे छायाचित्र काढण्याचा हा छंद क्वचितप्रसंगी जीवावरसुद्धा बेतू शकतो. एका तरुणाने सेल्फीच्या नादात आपले प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये घडलेल्या घटनेत १९ वर्षीय तरुणाने बंदुकीबरोबर सेल्फी काढण्याचे धाडस केले, ज्यात या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. सेल्फी काढताना बंदुकीतून सुटलेली गोळी घशात घुसल्याने हॉस्टन नावाच्या या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार या घटनेच्या वेळी हॉस्टनचा चुलत भाऊदेखील त्याच इमारतीत पण दुसऱ्या खोलीत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 4:25 am

Web Title: us teen kills himself while taking selfies with a gun
Next Stories
1 गणेश देवींकडूनही पुरस्कार परत
2 के. पी. शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान
3 सीबीआयचे ५० ठिकाणी छापे , सहा हजार कोटी हाँगकाँगला पाठवल्याची माहिती
Just Now!
X