भारतात करोना काळात शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका विद्यार्थिनीने परीक्षेत तिसरा क्रमांक आल्याने कोर्टात धाव घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिने आक्षेप घेत तिने थेट कोर्टाचं दार ठोठावलं आहे. गेल्याच आठवड्यात तिचा निकाल लागला होता. मात्र हा निकालच तिला कोर्टात जाण्याचं कारणीभूत ठरला. परीक्षा उत्तमरित्या देऊनही तिसरा क्रमांक कसा असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. डॅली सुलिवन असं त्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

कोर्टात वकील नेमण्यासाठी डॅलीकडे पुरेसे पैसे नव्हते. वकिलांनी तिच्याकडे ७५ हजार डॉलर्स फीची मागणी केली होती. इतकी फी भरू शकत नसल्याने तिने हा खटला स्वत: लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुद्देसूद तयारी करत तिने कोर्टासमोर भक्कमपणे बाजू मांडली. ऑनलाइन सुनावणी दरम्यान डॅलीने प्रत्येक मुद्दे पुराव्यानिशी स्पष्ट केले. यावेळी न्यायाधीशही तिची बाजू ऐकून अवाक झाले. तिने यावेळी अल्पाइन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या हँडबूकमधील काढलेले उतारे, ईमेल आणि शाळेतील धोरणांचा पाढा वाचला. त्याचबरोबर शाळेत ग्रेड पॉइंट सरासरीत चुका केल्याचा आरोपही केला. दुसरीकडे शाळा प्रशासनाने तिचा तिसरा क्रमांक असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

करोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्राची मोठी घोषणा! मोफत शिक्षण, दरमहा स्टायपेंड, १० लाखांची मदत!

डॅली वर्गातील हुशार विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तिने डग्लस वादविवाद स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर ती मॉक ट्रायल टीमची सदस्यही होती. डॅलीने कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. सध्या न्यायालयीन खटला असून तिला निकालाची प्रतिक्षा आहे.