अमेरिकेने आपल्या देशातील नागरिकांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दहशतवादी कारवायांची शक्यता पाहता आशियामधील काही देशांमध्ये प्रवास न करण्याचा किंवा प्रवास करण्यासंदर्भात पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेने जारी केलेल्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरीमध्ये (म्हणजेच प्रवासासंदर्भातील सल्ले आणि सूचना) पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाण्याचा विचार करत असणाऱ्या अमेरिकन नागकिकांना या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्याचा सल्ला अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तसेच अमेरिकन नागरिकांनी अफगाणिस्तानमध्ये जाऊ नये असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Covid 19 Vaccine : पाकिस्तानलाही हवीय ‘मेड इन पुणे’ करोना लस, पण…

दक्षिण आशियामधील देशांमध्ये प्रवास करण्याच्या विचारात असणाऱ्या अमेरिक नागरिकांना बायडेन सरकारने इशारा दिला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करण्यासंदर्भातील परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना आणि सल्ल्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने बदल केला आहे. “करोना, दहशतवाद आणि जातीय हिंसाचार लक्षात घेता पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याच्या विचारत असणाऱ्यांनी आपल्या निर्णयासंदर्भात फेरविचार करावा,” असं परराष्ट्रमंत्रालयाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> गांजा वाचवू शकतो करोना रुग्णांचे प्राण; संशोधकांचा दावा

नक्की वाचा >> एक दोन नाही तब्बल ३१ वेळा ‘ति’च्या करोना चाचणीचे रिपोर्ट्स आले पॉझिटिव्ह

भारत-पाकिस्तान सीमा भागांमध्ये जाणं टाळा

दहशतवाद आणि अपहरणाच्या वाढत्या घटना पाहता बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात न जाण्याचा सल्ला या अ‍ॅडव्हायजरीमध्ये देण्यात आलाय. अमेरिकन नागरिकांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होऊ शकणारा संघर्ष आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागामध्ये जाण्याचं टाळावं, असंही या अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे. “भारत-पाकिस्तानच्या सीमांना लागून असणाऱ्या भागांमध्ये प्रवास करु नये. या ठिकाणी दहशतवादी कारवाया होत असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमांवर दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणात सैन्य आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करादरम्यान अनेकदा दोन्हीकडून गोळीबार आणि संघर्ष होत असतो,” असा थेट उल्लेख या अ‍ॅडव्हायजरीमध्ये करण्यात आलाय.

नक्की वाचा >> भारताने शेजाऱ्यांना मदत केल्याने चीनचा तीळपापड; ‘कोव्हिशिल्ड’बद्दल पसरवू लागला चुकीची माहिती

बांगलादेश, अफगाणिस्तानही टाळा

पाकिस्तानबरोबरच अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने करोनाचा संसर्ग त्याचबरोबर गुन्हेगारी, दहशतवाद आणि अपहरणांच्या प्रकरणांची संख्या लक्षात घेत बांगलादेशमध्ये जाण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनाही फेरविचार करण्याचा सल्ला दिलाय. तसेच अन्य एका बदलानुसार करोना, गुन्हेगारी, दहशतवाद, अशांतता, अपहरण आणि सशस्त्र संघर्ष सुरु असणाऱ्या अफगाणिस्तानमध्येही अमेरिकन नागरिकांना प्रवास करणं टाळावं असं अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटलं आहे. प्रवासाच्या दृष्टीने अफगाणिस्तानमधील सर्वच प्रदेश हे धोकादायक असल्याचं परराष्ट्रमंत्रालयानं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> भारतातील करोना लसीकरणात कंडोम बनवणारी कंपनी बजावणार महत्त्वाची भूमिका

या देशातील प्रवाशांना बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने ब्राझील, आर्यलॅण्ड, ब्रिटनबरोबरच इतर युरोपियन देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांवर औपचारिकरित्या बंदी घातली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आलीय. करोनाच्या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचाही या बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.

नक्की वाचा >> जाणून घ्या : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नक्की किती पगार मिळतो?; इतर कोणत्या सुविधा त्यांना दिल्या जातात?