अमेरिकेने दिलेल्या AstraZeneca च्या कोविड प्रतिबंधक लसीबद्दलच्या चाचणी अहवालानुसार ही लस ७९ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

जरी ५०० पेक्षा जास्त देशांमध्ये AstraZeneca ची कोविड प्रतिबंधक लस अधिकृत केली गेली आहे, तरी अमेरिकेत अद्याप या लसीला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. अमेरिकेने दिलेल्या चाचणी अहवालानुसार ३०,००० स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला होता, त्यातील २०,००० लोकांना ही लस दिली गेली तर उर्वरित लोकांना डमी शॉट्स देण्यात आले. या चाचणीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

एका निवेदनात AstraZeneca कंपनीने असे सांगितले की, ही लस लक्षणं दिसत असलेल्या कोविड -१९ हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी ७९ टक्के कार्यक्षम आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर गंभीर आजारांविरूध्द १०० टक्के प्रभावी आहे. ही लस वृद्ध लोकांसह सर्व वयोगटात प्रभावी आहे, असे तपासकर्त्यांनी म्हटले आहे.

ब्रिटनने प्रथम युके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशातील चाचण्यांच्या अंशत: निकालांवर आधारित लस अधिकृत केली ज्यात असे दिसून आले की हे शॉट्स सुमारे ७० टक्के प्रभावी आहेत. परंतु हे परिणाम उत्पादकांच्या चुकांमुळे झाकोळले गेले ज्यामुळे काही सहभागी लोकांना त्यांच्या पहिल्या शॉटमध्ये अर्धा डोस मिळाला आणि संशोधकांनी ही त्रुटी त्वरित समजू शकली नाही.

त्यानंतर अधिक प्रश्न उद्भवू लागले की या लसीने वृद्ध प्रौढांना किती चांगले संरक्षण दिले आणि दुसऱ्या डोससाठी किती काळ थांबावे लागणार आहे. जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमसह काही युरोपियन देशांनी प्रारंभी वृद्ध प्रौढ व्यक्तींसाठीचे शॉट रोखले आणि नवीन आकडेवारीनुसार वरिष्ठांना संरक्षण देण्यात आल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्यांचे निर्णय मागे घेतले.

गेल्या आठवड्यात, बहुतेक युरोपमधील डझनपेक्षा अधिक देशांनी रक्तात गाठी होत असल्याच्या संबंधित वृत्तानंतर AstraZeneca या लसीच्या शॉटचे वापर तात्पुरते निलंबित केले होते. गुरुवारी, युरोपियन औषध एजन्सीने तपासणीनंतर असा निष्कर्ष काढला की या लसीमुळे रक्तात गाठी होण्याचा एकूण धोका वाढवित नाही.

त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, इटली आणि इतर देशांनी शुक्रवारी या लसीचा वापर पुन्हा सुरू केला.