अमेरिकेतील नेब्रास्कातील एका बर्गर किंग आउटलेटच्या कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. त्यामुळे आउटलेट काही काळासाठी बंद पडलं होतं. इतकंच नाही कर्मचाऱ्यांनी आउटलेटच्या बाहेर फलक लावत काम सोडल्याचं जाहीर देखील केलं. “आम्ही सर्व नोकरी सोडत आहोत, दिलेल्या तसदीबद्दल खेद आहे” असा मजकूर त्या फलकावर लिहिण्यात आला आहे. आउटलेटमधील व्यवस्थापनावर कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. वरिष्ठांना तक्रार करून देखील ठोस पावलं उचलली जात नव्हती. अखेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक राजीनामा दिला. आउटलेटबाहेर लागलेला फलक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यानंतर बर्गर किंग व्यवस्थापन खडबडून जागं झालं आहे.

“कर्माचारी कामाच्या व्यवस्थेबद्दल खूश नव्हते. आम्ही हे वरिष्ठांसमोर याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. किचनमधील वातानुकूलीन यंत्रणा खराब झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उकाडा सहन करत किचनमध्ये काम करावं लागत होतं. डीहायड्रेशनमुले काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. आठवड्याला ५० ते ६० तास काम करावं लागत होतं”, असं मॅनेजर रेशल फ्लोर्स हीने एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

नेब्रास्कातील आउटलेटमध्ये एकूण ९ कर्मचारी काम करत होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. आउटलेटबाहेर फलक लावत राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. यामुळे कंपनीची चांगलीच नाचक्की झाली. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर व्यवस्थापनाने “Now Hiring Flexible Shedule” असा फलक बाहेर लावला. त्याचबरोबर कंपनी प्रशासनाकडून या आउटलेटची दखल घेण्यात आली आहे. आउटलेटमध्ये कंपनीच्या ब्रँड मूल्यांवर काम होत नव्हतं, अशी कबुली कंपनीनं दिली आहे. “भविष्यात पुन्हा असं होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. आम्ही आउटलेटच्या उणीवांकडे गंभीरतेने लक्ष घालू”, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.