24 April 2019

News Flash

कॅलिफोर्नियाजवळ पबमध्ये गोळीबार, १३ ठार

घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचले असून हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे समजते.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळ बारमध्ये गोळीबाराची घटना घडली असून या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोरालाही कंठस्नान घातले असून त्याने हा गोळीबार का केला, याचा पोलीस तपास करत आहेत.

कॅलिफोर्नियाजवळ बॉर्डरलाइन बार अँड ग्रिल हा पब असून या बारमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

गोळीबाराचे वृत्त समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सर्वप्रथम तिथे अडकलेल्यांची सुटका केली. या हल्ल्यात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. तर १२ जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, आम्ही सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘मी पहिले गोळी झाडण्याचा आवाज ऐकला. माझ्या मुलाला ही मस्करी वाटत होती. मग सातत्याने गोळीबाराचा आवाज येताच त्याची देखील खात्री पडली. शेवटी मी त्याला खाली खेचले आणि जमिनीवर झोपायला सांगितले. आम्ही कसेबसे बाहेर येण्यात यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया त्या मुलाच्या वडिलांनी दिली.

First Published on November 8, 2018 2:37 pm

Web Title: usa mass shooting at california thousand oaks bar multiple people injured