News Flash

…तर उसेन बोल्टलाही वाटेल भारताच्या मान्सूनचा अभिमान

तो ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा मागे होता. १३ जूनपासून तो जागचा हलला नाही. त्यावेळी आठ वर्षात पहिल्यांदाच मान्सून मोठा ब्रेक घेणार का ? यावरुन अनेकांनी पैजा लावण्यास

उसेन बोल्ट

तो ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा मागे होता. १३ जूनपासून तो जागचा हलला नाही. त्यावेळी आठ वर्षात पहिल्यांदाच मान्सून मोठा ब्रेक घेणार का ? यावरुन अनेकांनी पैजा लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो थोडा पुढे सरकला आणि नंतर त्याने जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टसारखा वेग पकडला आणि नऊ दिवसांची पिछाडी भरुन काढत २९ जून ऐवजी २८ जूनलाच दिल्लीत दाखल झाला.

बोल्ट सारख्या वेगामुळे मान्सूनने १७ दिवस आधीच देश व्यापून टाकला आहे. मान्सून १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकतो. पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर मान्सूनचे शेवटचे स्टेशन आहे. पण मान्सून त्याआधीच श्रीगंगानगरमध्ये पोहोचला आहे. भारतात चार महिन्याच्या मान्सूनच्या हंगामाला १ जूनला सुरुवात होते आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस वेगवेगळया भागात कोसळत असतो.

यंदा मान्सून २९ जूनलाच नियोजित वेळापत्रकाच्या तीन दिवसआधीच केरळात दाखल झाला. चार महिन्यात एकूण पावसापैकी जूनमध्ये १७ टक्के, जुलैमध्ये ३२ टक्के, ऑगस्टमध्ये २८ टक्के आणि सप्टेंबरमध्ये २३ टक्के पाऊस कोसळतो. भारताचा जीडीपी आणि शेती मोठया प्रमाणावर मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2018 1:04 pm

Web Title: usain bolt india monsoon
टॅग : Usain Bolt
Next Stories
1 पुढचा पंतप्रधान कोण ? शरद पवार म्हणाले…
2 ट्रिपल तलाकनंतर, निकाह हलाला व बहुपत्नीत्व मोदी सरकारच्या निशाण्यावर
3 कर्नाटकात आमदारांची फोडाफोडी? बी.एस.येडियुरप्पांनी दिले संकेत
Just Now!
X