03 June 2020

News Flash

घराबाहेर पडताना सुती कापडाचे मास्क वापरा!

मास्कमुळे आजूबाजूच्या लोकांचे संसर्गापासून संरक्षण होणार आहे

संग्रहित छायाचित्र

 

भारतात करोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडताना नागरिकांनी सुती कापडाचे मास्क वापरावे, असा सल्ला केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांना दिला आहे.

केंद्र सरकारने म्हटले आहे, की  या मास्कमुळे आजूबाजूच्या लोकांचे संसर्गापासून संरक्षण होणार आहे. घरगुती तयार केलेल्या मास्कचा लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वापर केला तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात असे काही देशांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारचा सल्ला

* केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जे लोक जास्त लोकसंख्या घनतेच्या भागात राहतात, त्यांनी मास्क वापरणे जास्त गरजेचे आहे.  शक्यतो घरी तयार केलेले पुनर्वापराचे मास्क वापरावेत. त्यामुळे उच्छ्वास व शिंकेतील कण बाहेर पसरण्याचा धोका कमी होतो.

* हे मास्क साध्या सुती कापडाचे असावेत, ते रंगीत असल्याने कुठलाही धोका निर्माण होत नाही, पण ते  पाच मिनिटे गरम पाण्यात टाकून धुऊन वाळवले पाहिजेत. हे मास्क अचूक असले पाहिजेत. ते चेहऱ्यावर किंबहुना नाकावर योग्य प्रकारे बसले पाहिजेत. त्यात बाजूने फटी असता कामा नयेत.

* मास्क घालताना आधी हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरण्याचे टाळावे. प्रत्येकाचा मास्क वेगळा असला पाहिजे. हे मास्क दररोज धुणे गरजेचे आहे, असेही सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:17 am

Web Title: use a cotton mask when you are outdoors abn 97
Next Stories
1 रेल्वे १५ एप्रिलला सुरू  करण्याबाबत अंतिम निर्णय नाही!
2 बंगळूरुतील संस्थेकडून ‘रॅपिड कोविड – १९’ संच विकसित
3 करोना व्हायरसवर मोदी-ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा
Just Now!
X