आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांची संख्या गेल्या दहा वर्षांत सहापटीनं वाढली असल्याचं समोर आलं आहे. या सर्वेक्षणानुसार, १५ ते ४९ या वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांमधील कंडोम वापरण्याचे प्रमाण २ टक्क्यांहून १२ टक्क्यांवर गेले असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणातून ‘सेफ सेक्स’ला प्राधान्य देणाऱ्या अविवाहित आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांचे प्रमाण भारतात वाढत असल्याचं सिद्ध झाले आहे.

२०१५-१६ दरम्यान ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’ करण्यात आला. यानुसार १५ ते ४९ या वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांमधील कंडोम वापरण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढलं असल्याचं समोर आलं आहे. देशातील तरुणी आणि महिलांचा कल सेफ सेक्सकडे झुकताना यातून दिसत आहे. यातील सर्वाधिक महिला या २० ते २४ वयोगटातील आहेत.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Women MP in parliement
Loksabha Election : महिला उमेदवारांची संख्या वाढतेय; पण जिंकणाऱ्यांचं प्रमाण का घटतंय? १९५७ पासूनची आकडेवारी काय सांगते?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

तर दुसरीकडे विवाहित माहिला कुटुंब नियोजनासाठी नसबंदीला महत्त्व देतात असं समोर आलं आहे. या सर्वेक्षणानुसार ७२ टक्के महिलांना कुटुंबनियोजनाबद्दल माहिती आहे. टीव्हीवरील जाहिराती किंवा ऐकीव माहितीनुसार कुटुंबनियोजन यासारखा प्रकार अस्तित्त्वात असल्याचं या महिलांनी मान्य केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार पंजाब राज्यात सर्वाधिक गर्भनिरोधक साधनं वापरली जातात तर मणिपूर, मेघालय, बिहार राज्यांत गर्भनिरोधक साधनांचा वापर कमी केला जात असल्याचंही यात म्हटलं आहे.