News Flash

“करोना रुग्णांवर मोनोक्लोनल अॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर अत्यंत महत्त्वाचा”; आयसीएमआरच्या माजी प्रमुखांचे मत

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ३ ते १० दिवसांमध्ये अॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर करण्याचा सल्ला

डॉ. रमण गंगाखेडकर

करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक प्रभावी औषधांचा वापर करण्यात येत आहे. यात आता एका औषधाची भर पडली आहे. ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ असं या औषधाचं नाव असून, केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे करोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे. मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे उत्परिवर्तन (म्यूटेशन) आणखी होण्याची शक्यता नाही, आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. या पद्धतीचा तर्कसंगत उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

भारतील फार्मा कंपनी रॉश इंडियाने बनवेलले अँटिबॉडी कॉकटेल आधी करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना देण्यात येत आहेत. या औषधाला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली.

आणखी वाचा- करोनावर आता ‘कॉकटेल’ उपचार! एका डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये!

डॉ. रमण गंगाखेडकर यांनी रविवारी सांगितले की,” “सिद्धांतानुसार मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूचे म्यूटेशन होण्याची शक्यता नाही. एखाद्या व्यक्तीस विषाणूऐवजी अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे मध्यम ते गंभीर आजार होण्याची शक्यता असते”. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूची पुनरावृत्ती होण्यापासून टाळता येते. अँटीबॉडी कॉकटेलचा तर्कसंगत उपयोग “अत्यावश्यक” आहे. करोनाची लागण झाल्यानंतर तीन-दहा दिवसांच्या आत अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर करावा,” असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल उपचारामुळे करोनाच्या नविन व्हेरियंट्स पासून संरक्षण होऊ शकते असे कोणतेही पुरावे नाहीत असेही ते म्हणाले.

आणखी वाचा- देशात आढळले १,५२,७३४ नवीन करोना रुग्ण, ३,१२८ जणांचा मृत्यू

Casirivimab आणि Imdevimab या दोन प्रकारच्या अँटिबॉडिजचं कॉकटेल करून हे कॉकटेल इंजेक्शन तयार करण्यात येतं. या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत तब्बल ५९ हजार ७५० रुपये आहे. सिप्ला कंपनीकडून हे कॉकटेल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ४० किलोपेक्षा जास्त वजन असणाऱ्या मुलांमध्ये देखील याचा वापर करता येऊ शकतो असे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ नरेश त्रेहान यांनी सांगितले. याच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 8:11 am

Web Title: use of monoclonal antibody cocktails on corona patients is extremely important opinion of former head of icmr dr gangakhedkar abn 97
Next Stories
1 उत्तर प्रदेश : करोना रुग्णाचा मृतदेह पुलावरुन नदीमध्ये फेकणाऱ्यांची ओळख पटली; गुन्हा दाखल
2 देशात प्राणवायूची आता दहापट निर्मिती 
3 करोना चाचणी टाळण्यासाठी आदिवासींचे पलायन!
Just Now!
X