News Flash

‘युवकांची माथी भडकावण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर’

तरुणांना दहशतवादी कारवायांकडे वळवण्यासाठी पाकिस्तान खोटय़ा गोष्टी रचत असल्याचेही सिंग यांनी मंगळवारी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

काश्मीरच्या युवकांचे कट्टरीकरण करण्यासाठी आणि भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहीम राबवण्यासाठी पाकिस्तान समाजमाध्यमांचा वापर करत असल्याचे जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे.

तरुणांना दहशतवादी कारवायांकडे वळवण्यासाठी पाकिस्तान खोटय़ा गोष्टी रचत असल्याचेही सिंग यांनी मंगळवारी सांगितले.

काश्मीरमध्ये छद्म युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू केल्यानंत आणि त्याला प्रोत्साहन दिल्यानंतर पाकिस्तान आता युवकांच्या कट्टरीकरणासाठी आणि आपल्यादेशाविरुद्ध अपप्रचार मोहीम राबवण्यासाठी पाकिस्तान समाजमाध्यमांचा वापर करत आहे. हा देश जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादाला सतत प्रोत्साहन देत आहे, तसेच तो कायम राहावा यासाठी प्रयत्न करत आहे, असेही सिंग म्हणाले.

विदेशातील सशस्त्र दलांच्या तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबच्या नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांचा एक गट काश्मीरच्या दौऱ्यावर आला असून त्यांनी मंगळवारी जम्मूतील पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालकांची भेट घेतली.

काश्मिरात पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ातील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी बुधवारी केलेल्या हातबॉम्बच्या हल्ल्यात किमान तीन जण जखमी झाले. कुलगाम जिल्ह्य़ातील दमहाल हांजिपोरा येथील स्थानिक पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकले. या बॉम्बचा रस्त्याशेजारी स्फोट झाल्यामुळे तीन नागरिक जखमी झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:40 am

Web Title: use of social media to spread the rift of the youth
Next Stories
1 आवर्ती सारणीच्या दीडशे वर्षांनिमित्त वर्षभर उत्सव
2 Budget 2019 : हंगामी अर्थसंकल्पाच्या पोतडीत काय?
3 सांख्यिकी आयोगातील राजीनाम्यांवर सरकारकडून सारवासारव
Just Now!
X