News Flash

गुप्त कारवायांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर; पाकिस्तानी गुप्तहेराचा खुलासा

भारतीय यंत्रणांनी ISI चा डाव उधळला

भारतीय सैन्याची गोपनीय माहिती मिळवण्याचा ISI चा डाव सर्तक असलेल्या तपास यंत्रणांनी उधळून लावला आहे. आयएसआयच्या कटामध्ये सहभागी असलेल्या अबिद हुसैन याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल अ‍ॅपलिकेशन वापरण्याचा सल्ला दिला होता. तपास यंत्रणांच्या नजरेतून सुटण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापर असा सल्ला अबिद हुसैनने दिला होता. अबिद हुसैन नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आपण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहोत हे अबिद हुसैनला माहित सुद्धा नव्हते. अबिदने माहिती मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीला हेरले होते, तो लष्करी सेवेत काम करतो असा त्याचा समज होता. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरता का? म्हणून अबिदने त्या व्यक्तीकडे विचारणाही केली होती. लष्करात व्हॉट्स अ‍ॅप वापरण्याची परवानगी नाही असे समोरच्या व्यक्तीने सांगितले, तेव्हा लपून-छपून व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी त्याने आग्रह धरला होता.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना रेड हँड पकडण्यासाठी त्यांना प्रलोभन दाखवण्यात आले होते. अबिद हुसैन आणि ताहीर खान हे जानेवारी महिन्यापासून तपास यंत्रणांच्या रडावर होते. “लष्करातील जूनियर रँकिंगच्या अधिकाऱ्यांना हेरुन त्यांच्याशी मैत्री वाढवायचे व त्यांच्याकडून सैन्य तुकडयांच्या सीमेवरील हालचालींसदर्भात माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा” असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं. या कारवाईमुळे आधीपासूनच खराब असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधात आणखी तणाव निर्माण होणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी ऑफिशिअल सिक्रेट कायद्यातंर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 5:13 pm

Web Title: use whatsapp to avoid detection expelled pakistan spies told indian decoy dmp 82
Next Stories
1 “करोनाचा विषाणू निष्प्रभ होतोय”; इटलीच्या डॉक्टरांचा दिलासादायक निष्कर्ष
2 ….तर करोनाची परिस्थिती आज वेगळी असती, तज्ज्ञांनी मोदींकडे सोपवला अहवाल
3 ड्रॅगनची मुजोरी, भारतावर दबाव टाकण्यासाठी लडाख सीमेजवळ चीनच्या फायटर विमानांची उड्डाणं
Just Now!
X