01 October 2020

News Flash

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ ऑनलाईन संकेतस्थळावर विक्रीला

इबे या अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर हा प्रकार घडला.

PM Nawaz Sharif for sale on ebay: पाकिस्तानी पीएम फॉर सेल’ या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.

एका अज्ञात व्यक्तीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विक्रीची जाहिरात ऑनलाईन संकेतस्थळावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. इबे या अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर हा प्रकार घडला. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६६,२०० पौंड असा मजकूर या जाहिरातीत लिहिण्यात आला आहे. वापरून झालेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ विकणे आहे. हे उत्पादन अनुवांशिकरित्या सदोष आहे. सध्या चालू अवस्थेत नाही, कधीच नव्हते, असेदेखील या जाहिरातील म्हटले आहे. ‘युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल’ या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.

इबेवरील जाहिरात
युजलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल
किंमत- ६२लाख
स्थिती – नवीन परंतु दोषयुक्त
डिलिव्हरी ऑप्शन – भारतात डिलिव्हरी नाही

Ebay

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2016 3:43 pm

Web Title: useless pakistani pm nawaz sharif for sale on ebay
Next Stories
1 नागपूर संघभूमी नव्हे तर दीक्षाभूमी – कन्हैया कुमार
2 कन्हैया कुमारच्या गाडीवर नागपूरमध्ये दगडफेक, बजरंग दलाचे कार्यकर्ते ताब्यात
3 म्यानमारच्या भूकंपाचे भारतातही धक्के
Just Now!
X