News Flash

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रुग्ण वाढल्यास स्थिती गंभीर

ग्यू प्रारूपानुसार ऑक्टोबपर्यंत देशात १,३६,०५६ बळी

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रुग्ण वाढल्यास स्थिती गंभीर
प्रतिकात्मक छायाचित्र

‘हार्वर्ड ग्लोबल’च्या तज्ज्ञांचा इशारा; ग्यू प्रारूपानुसार ऑक्टोबपर्यंत देशात १,३६,०५६ बळी

उत्तर प्रदेश, बिहारसारख्या जास्त लोकसंख्येच्या राज्यात जेव्हा करोनाचे रुग्ण वाढू लागतील तेव्हा भारतातील परिस्थिती गंभीर होऊन मृतांची संख्या वेगाने वाढेल, असे हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. आशिष झा यांनी म्हटले आहे. सध्या रुग्णांची वाढत असलेली संख्याही चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रविवारी भारतात करोना रुग्णांची संख्या १५ हजार ४१३ इतकी वाढली असून एकूण रुग्णांची संख्या चार लाखांवर गेली आहे. ३०६ नवीन मृत्यू झाल्याने आता मृतांची एकूण संख्या १३ हजार २५४ झाली आहे.

झा यांनी सांगितले की, भारतात सध्या कोविड-१९ रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्याला लोकसंख्येची घनता ही कारणीभूत आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांत रुग्ण वाढत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात सध्या परिस्थिती जास्त गंभीर नसली तरी तेथे रुग्ण वाढू लागले तर गंभीर स्थिती निर्माण होईल. भारतातील रुग्णांची संख्या वाढल्याने आता त्याचा समावेश पहिल्या पाच करोनाग्रस्त देशात आहे. लागोपाठ सहा दिवस भारतात  रोज दहा हजार रुग्ण वाढले आहेत. लागण, लक्षणे दिसणे व मृत्यू यातील कालावधीत बदल होत आहेत. आगामी काही आठवडे किंवा महिने रुग्णांचा आकडा वाढत आहे. भारतात कमी लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या फारशा होत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णांचा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. अनेक घटकांचा समावेश असल्याने कोविड १९ साथ भारतात कशी पसरत जाईल हे सांगणे कठीण आहे. ग्यू यांच्या प्रारुपानुसार, १ ऑक्टोबर २०२० अखेरीस भारतात १ लाख ३६ हजार ५६ मृत्यू होतील आणि  २ कोटी ७३ लाख ३३ हजार ५८९ रुग्ण असतील. हा केवळ अंदाज आहे. किमान वर्षभर करोनाचा सामना करावा लागणार आहे.

भारतात चाचण्यांचे प्रमाण अल्प

भारतात जी टाळेबंदी लागू करण्यात आली होती ती योग्य होती पण ती दीर्घकाळ लावता येणार नाही. टाळेबंदी हा उपाय केवळ आपल्याला सज्जतेचा काळ देत असतो. अजूनही चाचण्यांचे प्रमाण भारतात कमी आहे. भारतात हजारात ४.२ लोकांच्या चाचण्या होत आहेत. हा जगातील सर्वात कमी चाचणी दर आहे. अमेरिकेत हा  चाचणी दर हजारात ७२, ब्रिटनमध्ये ५९ तर रशियात १०६ होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:16 am

Web Title: uttar pradesh bihar the condition is critical if the number of patients increases abn 97
Next Stories
1 ट्रम्प यांच्या विरोधातील पुस्तकाचे प्रकाशन रोखण्यास नकार
2 करोनाविरोधात योगसाधनेचा लाभ -मोदी
3 ‘सीआयएसएफ’च्या जवानाचा करोनाने मृत्यू
Just Now!
X