राज्यसभेच्या ५९ जागांपैकी २५ जागांवर शुक्रवारी मतदान झाले पण, ही निवडणूक मतांच्या फुटीमुळे गाजली! उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक या तीन राज्यांमध्ये आमदारांनी व्हीप धुडकावून विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मत दिले. उत्तर प्रदेशमध्ये बसप आमदार अनिल सिंह आणि सप आमदार नितीन अगरवाल यांनी भाजपला मत दिले. अनिनल सिंह यांनी आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने मत दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे सप-बसप आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती.

झारखंडमध्येही विरोधी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे (प्रजातांत्रिक) आमदार प्रकाश राम यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मत न देता भाजपला मत दिले. त्यांचे मत बाद करण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली. आमदार राजकुमार यादव यांनी एकाच वेळी दोन उमेदवारांना प्रथम क्रमांकांची मते दिल्याने त्यांचे मत बाद झाले.

कर्नाटकात काँग्रेसचे तीन उमेदवार जिंकून आले. काँग्रेसकडे दोन उमेदवार जिंकण्याएवढेच संख्याबळ होते. तिसऱ्या जागेवर जनता दलाचा उमेदवार जिंकणे अपेक्षित होते मात्र, काँग्रेसचाच उमेदवार जिकून आला. चौथ्या जागेवर भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली. त्यामुळे काँग्रेसने मतांची खरेदी केल्याचा आरोप जनता दलाने केला आहे.

उत्तर प्रदेशातील विजयी उमेदवार

उत्तर प्रदेशातून भाजपचे अरुण जेटली, अशोक बाजपेयी, विजयपाल सिंग तोमर, सकल दीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, हरनाथ सिंग यादव आणि जी. व्ही. एल. नरसिंह राव हे आठहीजण विजयी झाले. नवव्या जागेसाठी भाजपचे अनिल