News Flash

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात फेरबदल?

काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आदित्यनाथ येथे आले आहेत.

मोदी-आदित्यनाथ भेटीमुळे चर्चा

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याच्या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ आदित्यनाथ यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

आदित्यनाथ यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेण्यासाठी आदित्यनाथ दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आदित्यनाथ येथे आले आहेत. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी प्रसाद आणि मोदी यांचे विश्वासू ए. के. शर्मा यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:20 am

Web Title: uttar pradesh cabinet prime minister narendra modi union home minister amit shah bjp national president j p nadda akp 94
Next Stories
1 “भाजपामधून आणखी लोक येणार, मात्र…. ”; ममता बॅनर्जींचं मोठं विधान
2 भारताने ३ महिन्यांत ९५ देशांना दिल्या लशी, जाणून घ्या किती मोफत आणि विकत
3 “मुकुल रॉय भाजपाची अंतर्गत माहिती ‘टीएमसी’ला पुरवत होते, हे सर्वांना ठाऊक होतं”
Just Now!
X