25 October 2020

News Flash

कॅन्सरग्रस्त पतीशी शरीरसंबंधास नकार, पत्नीची हत्या

नोएडात राहणाऱ्या अजय उर्फ महेशचे सलूनचे दुकान होते. अजयचे १७ वर्षांपूर्वी ममताशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा अशी

प्रतिनिधिक छायाचित्र

पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने कॅन्सरग्रस्त पतीने तिची हत्या केल्याची घटना नोएडात घडली. अजय उर्फ महेश असे या आरोपीचे नाव असून त्याला तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते.

नोएडात राहणाऱ्या अजय उर्फ महेशचे सलूनचे दुकान होते. अजयचे १७ वर्षांपूर्वी ममताशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा अशी दोन मुलं आहेत. अजयला गेल्या वर्षी कर्करोगाने ग्रासले. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली होती. २० दिवसांपूर्वी ममता नोएडात भावाच्या घरी राहायला गेली. तिथे नोकरी करुन पतीच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्याचा तिचा प्रयत्न होता.

गेल्या काही महिन्यांमध्ये ममताने अजयशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. तोंडाचा कर्करोग असल्याने तिने नकार दिल्याचे अजयचे म्हणणे आहे. ‘ममताने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने अजयच्या मनात संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला वाटत होते. याच संशयातून त्याने ममताची हत्या केली’, असा आरोप ममताच्या नातेवाईकांनी केला. ११ जुलै रोजी अजय ममताचा भाऊ राहुल कुमार यांच्या घरी गेला. तिथे अजयने ममतावर चाकूने वार केले आणि पळ काढला. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:26 pm

Web Title: uttar pradesh cancer patient kills wife for denying him sex in noida
Next Stories
1 ३६५ दिवसांमध्ये ३ हजार ५९७ बळी… भारतात खड्ड्यांचीच ‘दहशत’
2 अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करा; विनाअट पाठिंब्यासह राहुल गांधींची मोदींकडे मागणी
3 ‘भारताला नरेंद्र मोदींसारखा निर्णयक्षम नेत्याची गरज, कुमारस्वामींसारखा ट्रॅजेडी किंग नको’
Just Now!
X