News Flash

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण

ट्विट करत दिली माहिती

फाइल फोटो (सौजन्य : पीटीआय)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण सध्या विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. याआधी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तर प्रदेशात एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांना करोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे पालन करत आहे”. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व कामं करत असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा- कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग

आणखी वाचा- झोप उडवणारी वाढ! देशात २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; १,८४,३७२ करोना बाधित

राज्यातील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सामान्य स्थितीत सुरु असल्याचं सांगताना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं तसंच काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:08 pm

Web Title: uttar pradesh chief minister yogi adityanath tested corona positive sgy 87
टॅग : Corona
Next Stories
1 कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग
2 आळशी लोकांना करोनामुळे मृत्यूचा धोका जास्त; नव्या अभ्यासातील धक्कादायक माहिती
3 झोप उडवणारी वाढ! देशात २४ तासांत १ हजारापेक्षा जास्त मृत्यू; १,८४,३७२ करोना बाधित
Just Now!
X