पश्चिम बंगालमध्ये केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (मंगळवार) तिथे जाणार आहेत. योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे जाणार आहेत. हेलिकॉप्टरने ते झारखंडला जातील तेथून रस्ते मार्गे पुरुलियाला जाणार असल्याचे सांगण्यात येते. पुरुलिया येथे ते जाहीर सभा घेणार आहेत.

ममता बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनास बसल्या आहेत. परंतु, आदित्यनाथ यांनी त्यावर टीका करत हे संविधानाविरूद्ध असल्याचे म्हटले आहे. आरोपी अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री त्याच्या घरी गेले. सीबीआय अधिकाऱ्यांनाच बंदी बनवणे लाजीरवाणे आहे. शारदा घोटाळ्याप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांच्या तपासावरुन आदित्यनाथ म्हणाले की, ही चौकशी केंद्र सरकार करत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सुरू आहे. तरीही ममता बॅनर्जींची वर्तणूक असंवैधानिक आहे.

राष्ट्रपती शासनाविषयी योगी आदित्यनाथ यांना विचारले असता, ते म्हणाले की, न्यायालय हे संपूर्ण प्रकरण पाहत आहे. तिथे राष्ट्रपती शासन लागू होईल की नाही हे न्यायालय ठरवेल. पण जे झाले ते लोकशाही विरोधात आणि पूर्णपणे असंवैधानिक आहे.