News Flash

सातवीतील मुलाचा चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु

प्रतिकात्मक छायाचित्र

सातवीत शिकणाऱ्या मुलाने शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

नोएडातील सेक्टर ७३ येथे परराज्यातून आलेले कामगार व मजूर राहतात. पीडित मुलगी व आरोपी मुलगा (वय १४ वर्ष) याच परिसरात राहत होते. पीडित मुलीचे आई- वडील सोमवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आरोपी मुलगा हा शाळेत गेलाच नव्हता. दुपारी घरी कोणीही नसताना त्याने शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीला घरी परतल्यावर पोटदुखीचा त्रास सुरु झाला. आई कामावरुन परतल्यावर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या मुलाला अटक केली. त्याची रवानगी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 11:24 am

Web Title: uttar pradesh class seven boy arrested in rape on 4 year old girl noida
Next Stories
1 विकृतपणाचा कळस, वीर्य भरलेला फुगा विद्यार्थिनीवर फेकला
2 कांचीपूरम पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन
3 जाणून घ्या काय आहे आयएनक्स मीडिया प्रकरण?, का झाली कार्ती चिदंबरमवर कारवाई ?
Just Now!
X