अकरावीत शिकणाऱ्या तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली असून त्याबाबत २६ डिसेंबरला मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.  ही तरूणी कॉलेजमधून घरी येत असताना अण्णू व त्याचे मित्र राजेश व ललित यांनी तिला मोटारीत लिफ्ट देऊ केली, तिने नकार देताच त्यांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर ही मुलगी नागला हांसी येथे घरी येऊन पोहोचली. तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली, नंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण ती नोंदवली गेली नाही. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. नंतर तिचे वडील पोलीस उप अधीक्षक गुलाब सिंग यांना भेटले, त्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली.