News Flash

खाकीचा धाक दाखवून पायावर घासायला लावलं नाक , पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य

इतकंच नाही तर त्या पोलिसाने बेल्टच्या सहाय्यानेही युवकाला मारहाण केली.

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात एका पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य समोर आलं आहे. या पोलिसाने आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवून एका युवकाला पायावर नाक रगडायला भाग पाडलं. इतकंच नाही तर त्या पोलिसाने बेल्टच्या सहाय्यानेही युवकाला मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत पोलीस शिपाई विजेंद्र सिंग याला निलंबित केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या व्यवहारावरुन या युवकाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्या व्यक्तीने पोलीस शिपाई विजेंद्र सिंग याला बोलावून युवकाला मारहाण केली. पोलिसासोबत त्या व्यक्तीनेही युवकाला मारहाण केली. त्यानंतर खाकीचा धाक दाखवून पोलिस शिपायाने तरुणाला पायावर नाक घासालंस तरंच तुला सोडेल असं म्हणत त्याला बळजबरी पायावर नाक रगडायला भाग पाडलं. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत त्या पोलीस शिपायाचं निलंबन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 8:22 am

Web Title: uttar pradesh cop forcing man to rub nose on his shoes suspended
Next Stories
1 दलितांना संसदेत कमी वेळ दिला जातो, भाजपाच्या महिला खासदाराची तक्रार
2 दिल्लीला पहाटे धुळीच्या वादळाचा तडाखा; काही भागात पावसाचीही हजेरी
3 ‘मॅक्स थंडर’मुळे उत्तर कोरिया नाराज; द. कोरियासोबतची उच्चस्तरीय बैठक केली रद्द
Just Now!
X