News Flash

माजी आमदाराच्या मुलीची गुंडगिरी, विद्यार्थिनीला भरवर्गातच मारहाण

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

याकूब कुरेशी यांच्या नातू धेवती रमक्षा मेरठमधील पब्लिक गर्ल्स स्कूल्समध्ये आठवी कक्षेत शिकते.

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाचे नेते आणि माजी आमदार याकूब कुरेशी यांच्या मुलीने क्षुल्लक कारणावरुन आठवीत शिकणाऱ्या मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याकूब कुरेशी यांच्या नातू धेवती रमक्षा मेरठमधील पब्लिक गर्ल्स स्कूल्समध्ये आठवी इयत्तेत शिकते. सोमवारी याकूब कुरेशी यांची मुलगी नजमा आणि तिच्यासोबत १० ते १२ जण शाळेत गेले. त्यांनी आठवीच्या वर्गात प्रवेश करुन चार विद्यार्थिनींनी चाबूक आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या सर्व प्रकाराने वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा विरोध केला असता सर्व जण कारमधून फरार झाले. याप्रकरणी मेरठ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सोतीगंजमधील मोहम्मद युसूफ यांच्या मुलीला नजमाने मारहाण केली. युसूफ यांची १३ वर्षांची मुलगी मारहाणीच्या घटनेनंतर घाबरली आहे. सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास कुरेशी यांची मुलगी नजमा आणि ८ ते १० जणांनी माझ्या मुलीला बेदम मारहाण केली. ‘नजमाची मुलगी क्लास बंक करुन तिच्या प्रियकरासोबत फिरायला गेल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप ते करत होते आणि यातूनच त्यांनी माझ्या मुलीला मारले’ असे युसूफ यांनी सांगितले. माझी मुलगी खूप घाबरली असून ती आता शाळेत जायला नकार देत आहे. पण आता मी स्वतः तिला सोडायला शाळेत जाईन असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 12:49 pm

Web Title: uttar pradesh daughter of bsp leader former mla haji yakub qureshi thrashed school students inside premises meerut
Next Stories
1 पासपोर्ट मिळणार फक्त ३ दिवसांत; पोलीस व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप
2 कुटुंबीयांनीच ‘ती’ला २० वर्षे अंधारकोठडीत डांबून ठेवलं!
3 अमेरिकेने दिली टिप, दिल्लीतून आयसिसच्या संशयित हस्तकाला अटक
Just Now!
X