25 February 2021

News Flash

गोळ्या घालून हत्या केलेली मुलगी पुन्हा परतली, पोलिसांना दिला जबाब

मुलीच्या नातेवाईकांवर तिच्या प्रियकराची हत्या केल्याचाही आरोप आहे

(सांकेतिक छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्यात प्रेमसंबंधांवरुन नाराज नातेवाईकांनी १८ वर्षीय मुलीची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्यांनी मुलीचा मृत्यू झाला आहे असं समजून तिचा मृतदेह जवळच्या झाडीत फेकून दिला आणि फरार झाले. पण मुलगी अद्यापही जिवंत होती. इटाह जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांवर तिच्या प्रियकराची हत्या केल्याचाही आरोप आहे.

गावकऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती –
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या गळ्याला गोळी लागली होती. ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं. मुलीची गंभीर स्थिती पाहता तिचा जबाब नोंदवण्यात आला आणि अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. मुलीचे तिच्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, ज्याचा नातेवाईकांकडून विरोध होत होता अशी माहिती मिळाली आहे.

आधी प्रियकराची हत्या, नंतर मुलीवर फायरिंग –
कुटुंबीयांनी समजूत काढूनही मुलगी काही ऐकण्यास तयार नव्हती. दोन दिवसांपुर्वी नातेवाईकांनी मुलीच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली. अलीगढ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यानंतर आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यानुसार रात्री मुलीची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मुलगी वाचली.

रुग्णालयात दिलेल्या जबाबात मुलीने आपली आई, वडील आणि मामावर आरोप केला आहे. अलीगढला जायचं असल्याचं सांगत मला घराबाहेर आणण्यात आलं होतं असं मुलीने सांगितलं आहे. पोलिसांनी जबाबाच्या आधारे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 1:32 pm

Web Title: uttar pradesh etah parents shot daughter returns alive sgy 87
Next Stories
1 ‘हा मनोहर पर्रीकरांचा पक्ष नाही’, मुलाची भाजपावर टीका
2 सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत; राहुल गांधींचा हल्लाबोल
3 ‘पप्पा तुम्ही गुंड पाठवलेत’, जातीबाहेर लग्न केल्याने भाजपा आमदाराकडूनच मुलीच्या जीवाला धोका
Just Now!
X